घराचे छत कोसळून आजीसह नातवाचा दुर्दैवी अंत

pachora

 

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथील एका घराचे छत अचानक कोसळल्याने आजीसह नातवाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना (दि.4) रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे गावातील इतर रहिवासींच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील नांद्रा जवळील नवेगावातील भाड्याच्या घरात राहणारे पाटील कुटुंब गाढ झोपलेले असतांना अचानक मातीचे छत कोसल्याने आजीसह नातवाचा झोपेतच करुण अंत झाला आहे. शोभाबाई नामदेव पाटील (वय-50) व नातू समर्थ संदिप पाटील (वय- सव्वावर्ष) रा. लोण ता.एंरडोल असे मयतांचे नावे आहेत. तर कुटुंबातील इतर सदस्य किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले.

Protected Content