जळगाव – लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकीवरून घसरून गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा गोदावरी हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान सकाळी मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
फरीद जमाल तडवी (३७) रा. बहुलखेडा ता. सोयगाव जि.औरंगाबाद असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “फरीद तडवी हा आई, पत्नी व मुलांसह वास्तव्याला आहे. रविवारी १२ जून रोजी सायंकाळी एका ठिकाणचे काम उरकावून सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास बहुलखेडा गावानजीक रोडवरून येत होता. पाऊस आल्याने रस्ता ओला झाला होता. त्यावेळी फरीद दुचाकीने जात असतांना अचानक दुचाकी घसरल्याने फरीदच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला खासगी वाहनाने रात्री ८ वाजता गोदावरी मेडीकल कॉलेजात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, सोमवार १३ जून रोजी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.” जिल्हा शासकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा मुलगी असा परिवार आहे.