Home Cities अमळनेर दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन लांबवली

दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन लांबवली

0
105

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील प्रताप मील परिसरात पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ७० हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन दुचाकीवर आलेल्या अनोळखी दोन चोरट्यांनी धुमस्टाइ्रल लांबविल्याची घटना बुधवारी २९ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी ३० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलकाबाई सुभाष लोहार वय ५९ रा. प्रताप मिल, अमळनेर या महिला बुधवारी २९ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घराच्या परिसरात पायी जात असतांना त्यांच्या समोरून दुचाकीवर अनोळखी दोन जण आले. दोघांनी महिलेच्या गळ्यातील ७० हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन जोरात बळजबरीने तोडून चोरून नेल्याची घटना घडली. महिलेने आरडाओररड केली तोपर्यंत दुचाकीवर असलेल्या दोघे पसार झाले होते. त्यानंतर महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. या घटनेबाबत गुरूवारी ३० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अनोळखी दोन चोरट्यांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करीत आहे.


Protected Content

Play sound