खरा बदला अजून पूर्ण झालेला नाही ; इराणच्या सर्वोच्च नेत्याची अमेरिकेला धमकी 

images 3

 

इराण (वृत्तसंस्था) क्षेपणास्त्र हल्ला ही फक्त अमेरिकेला लगावलेली एक चपराक आहे. बदला अजून पूर्ण झालेला नाही. बदला दुसराच काही तरी असणार आहे, अशा शब्दात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातून अमेरिकेला धमकी दिली आहे.

 

अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर हल्ला केल्यानंतर आज आयातुल्ला अली खामेनी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. या भाषणात ते म्हणाले आपण आपल्या शत्रूला ओळखले पाहिजे. त्याच्या योजना, पद्धत जाणून घेतली पाहिजे. राजकीय आणि लष्करी दृष्टया त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याकडे लोक आहेत. अमेरिका आपला शत्रू आहे. काल रात्री आपण त्यांन चपराक लगावली. या भागातील अमेरिकेचा अपवित्र वावर संपला पाहिजे. आपल्याला अधिक मजबूत होण्याची गरज आहे. आपण अधिक मजबूत झालो तर, शत्रू आपले नुकसान करु शकणार नाही. अमेरिका आपल्याबरोबर असलेली वैरभावना कधीच संपवणार नाही” असेही खामेनी यांनी म्हटले.

Protected Content