रत्नाकर नर्सरी जवळून ट्रक लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील मेहरून परिसरात असलेल्या रत्नाकर नर्सरी जवळील पेट्रोलपंपा समोरून एकाचा ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार बुधवार ३० ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहरातील मेहरून परिसरातील विशाल पेट्रोल पंपाजवळ असलेल्या रत्नाकर नर्सरी जवळ वसीम सैयद यांच्या मालकीची ही ट्रक (क्र. एमएच १९, सीवाय ५३१०) उभी केलेली होती. मंगळवार २९ ऑगस्ट रोजी रात्री १० ते बुधवार ३० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी साडेसात लाख रुपये किमतीचा ट्रक अज्ञात चोरट्याने चोरून नेला.

 

हा प्रकार लक्षात आल्यानंतर ट्रान्सपोर्ट मालक सय्यद अशपाक सय्यद निसार अली (वय-४३) रा. मेहरून, जळगाव यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक इमरान सय्यद करीत आहे.

Protected Content