जळगाव प्रतिनिधी । तालूक्यातील म्हसावद-वावडदा रेाडवरुन सुसाट वेगात नारळ वाहून नेणाऱ्या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटल्याने कुरकुरे नाल्यावरुन वीस फुट खाली ट्रक कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज ३१ डिसेंबर रोजी पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास घडली.
पोलिस पाटिल विनोद तुळशीराम गोपाळ यांना माहिती मिळताच त्यांनी मदतीला धाव घेत ग्रासम्थाच्या मदतीने ट्रक मध्ये अडकलेल्या चालकासह क्लिनरला बाहेर काढले. पोलिसांच्या मदतीने जखमी व मयताला ॲम्बुलन्सद्वारे जळगावी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
वावडदा(ता.जळगाव) येथील शेतकरी तरुणाला अपघात झाल्याचे दिसताच त्याने पोलिस पाटिल विनोद गोपाळ यांच्या घरी जावून माहिती दिली. गोपाळ यांनी ग्रामस्थांसह अपघात स्थळावर धाव घेतली. म्हसावद-वावडदा रेाडवरील कुरकुरे नाल्या वरुन ट्रक कोसळल्याचे दिसून आले. आंध्र प्रदेशातून नारळ घेवून जात असलेला ट्रक वावडद्याकडून म्हसावदच्या दिशेने सुसाट वेगात जात असतांना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने नाल्याचा कठडा तोडून ट्रक चक्क विसफुट खोल नाल्यात कोसळला. अपघातात ट्रकच्या केबीन मधील चालक व क्लिनर अडकलेले असल्याने पेालिस पाटलाने एमआयडीसी पोलिसांना घटना कळवली. अपघाताची माहिती कळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळावर दाखल झाले.
ग्रामस्थ व पोलिसांनी रेस्क्यु ऑपरेशन राबवुन तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मयत ट्रकची केबीन गॅसकटरने कापून चालक व क्लिनरला काढण्यात आले. केबिन मधील कागदपत्रे व फाईलवरून चालक शेख बडमियाँ शेख उदांत साहेबू (वय-३०,रा.१३३ विभारीता ताडून जि.कृष्णा, आंध्रप्रदेश) असे चालकाचे नाव असून त्याच्या सोबतचा चालक गंभीर जखमी झाला आहे. तातडीने ॲम्बुलन्स बोलावून मृतदेहासह जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे रवाना करण्यात आले.