जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यातील बोदवड येथील तहसील कार्यालयातील अव्वल कारकून संजय देविदास पाटील यांना आज (दि.१७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून लाच घेताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, बोदवड येथील एका रेशन दुकानदाराकडे त्याच्या दुकानासाठी तीन ग्राहकांचे रेशन कार्ड बनवण्यासाठी अव्वल कारकून संजय पाटील (रा- देवपुर, धुळे) यांनी ३६०० रुपयांची मागणी १२ डिसेंबर रोजी केली होती. त्यानुसार संबंधित दुकानदाराने आज त्यांना ३६०० रुपये तहसील कार्याकायात नेवून दिल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना रंगेहात पकडून त्यांच्याकडून रोख रक्कम जप्त केली.
ही कारवाई डीवायएसपी जी.एम.ठाकुर, पो.नि. निलेश लोधी, पो.नि. संजोग बच्छाव, हे.कॉ. अशोक अहीरे, पो.ना.मनोज जोशी, पो.ना. जनार्दन चौधरी, पो.कॉ. प्रशांत ठाकुर, पो.कॉ. प्रविण पाटील, पो.कॉ. नासिर देशमुख, पो.कॉ. ईश्वर धनगर यांच्या पथकाने केली.