टिपरला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने टिपरचालक ठार

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | किनगावराजाजवळ गिट्टी घेऊन जाणाऱ्या टिपरला समोरला येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने टिपरचालक जागीच ठार झाला तर ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंदखेडराजा – दुसरबीड महामार्गावरून रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास एक टिपर (क्रमांक : एमएच २८ – बीबी १४३१) दुसरबीडहून किनगावराजाकडे गिट्टी घेऊन जात होता. या दरम्यान समोरून चुकीच्या बाजूने भरधाव येणाऱ्या ट्रकने (क्रमांक : एमएच ४६ – एएफ ६७७५) किनगावराजाजवळ छगनलाल शिंगणे यांच्या घरासमोर या टिपरला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात टिपरचालक प्रवीण भीमराव मुळे (वय ३०, रा. खंडाळा, ता. लोणार) जागीच ठार झाला. तर ट्रकचालक पुंजाराम श्रावण कोसरे (रा. पोरगव्हाण, ता. आष्टी, जि. धुळे) गंभीर जखमी झाला. घटनेची नायक पोलिस कॉन्स्टेबल विष्णू मुंढे यांनी कार्यवाही केली. ट्रकचालक पुंजाराम कोसरे याच्याविरूद्ध किनगावराजा पोलिसांनी रात्री ३ वाजता गुन्हा दाखल केला.

Protected Content