जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शाहू नगरातील भोईटे गल्लीतून एका तरूणचा ३० हजार रूपये किंमतीचा महागडा मोबाईल चोरून नेल्याची घटना शनिवारी २० एप्रिल रेाजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी दुपारी १२.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील शाहूनगर येथील भोईटे गल्लीत रोहित मोहन राठोड वय २४ हा तरूण वास्तव्याला आहे. सध्या तो महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. शनिवारी २० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने तरूणाच्या खोलीतून ३० हजार रूपये किंमतीचा महागडा मोबाईल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रोहित राठोडने मोबाईल बाबत सर्वत्र चौकशी केली. परंत त्याला दुचाकीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर दुपारी १२.३० वाजता तरूणाने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर हे करीत आहे.