भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारातून महावितरण कंपनीच्या मालकीचे दोन सिंमेंटचे पोल तोडून अल्यूमिनीअमच्या तारांची चोरी केल्याची घटना निदर्शनास आली. याप्रकरणी शनिवारी २ सप्टेंबर रोजी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील साकेगाव शेत शिवारात महावितरण कंपनीच्या मालकीचे ईलेक्ट्रीक डीपीजवळील दोन सिमेंटचे पोल अज्ञात चोरट्यांनी तोडून नुकसान केले तसेच पोलला असलेल्या अल्यूमिनीअमच्या विद्यूत तार चोरून सुमारे २३ हजार ५०० रूपयांचे नुकसान केले आहे. हा प्रकार ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी महावितरण कंपनीचे कर्मचारी योगेश भंगाळे यांनी नुकसान व चोरी बाबत भुसावळ तालुका पोलीसात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भोई करीत आहे.