यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल बसस्थानक आवारातून महिलेच्या पर्समधून सव्वा लाखाची सोन्याची मंगलपोत लांबविल्याची घटना सोमवारी १० फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंजली किशारे जैन वय ५५ रा. बालाजी मंदीर, पारोळा या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. दरम्यान सोमवारी १० फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्या यावल बसस्थानक आवारात आलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून सव्वा लाख रूपये किंमतीचे सोन्याचे मंगलपोल लांबविली आहे. ही घटना उघडकीला आल्यानंतर महिलेने यावल बसस्थानक आवारात शोधाशोध सुरू केली. मंगलपोत संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर पोलीस ठाण्यात धाव त्यांनी तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल मोरे हे करीत आहे.