राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्षांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष गोवर्धन देवचंद जाधव यांनी ६ रोजी पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला.

सर्व चर्मकार समाज बांधवांसाठी सगळ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि समाजाचे जे काही काम जे काही शासकीय योजनेचे लाभ किंवा जे काही काम थांबलेले आहेत ते पुर्णत्वास नेण्यासाठी गोवर्धन देवचंद जाधव राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पाचोरा तालुका अध्यक्ष व संत शिरोमणी गुरु रविदास महाराज बौद्धेशीय संस्था तालुका अध्यक्ष यांनी आज शिवसेना शिंदे गट मध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे.

त्यांनी समाजासाठी जेही काम बाकी राहिलेले आहे त्यासाठी आज पुढाकार घेऊन समाजासाठी एक नवी दिशा ठरवली आहे. त्यांना सन्माननीय पाचोरा – भडगाव मतदार संघाचे पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते त्यांची सदस्य नोंदणी करून त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचे घोषित करण्यात आले. त्यांचे चर्मकार समाज तर्फे शुभेच्छा देण्यात येत आहे.

Protected Content