यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील वड्री येथे कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातीत विद्यार्थी या परिसरात शेती अभ्यासासाठी दाखल झाले आहेत.
वड्री (ता. यावल) परिसरात कृषी अभ्यासाकरीता आलेल्या विद्यार्थांमध्ये धीरज निकाळजे, राहुल पी., अभिषेक पाटील, चेतन पाटील, गौरव पाटील व मुकेश पाटील हे सर्व कृषी दुत विद्यार्थी वड्री येथे चार महीने थांबुन शेती पद्धती व पिक प्रात्यक्षिकाची माहिती घेतील. शेतकऱ्यांना वित्तीय पुरवठा करणाऱ्या सोसायटीचे कार्य कशा पद्धतीने चालते ? त्यात कर्जवाटप वसुली व अन्य कामकाजाची माहिती समजुन घेतील. वड्री येथील ग्रामपंचायत सरपंच ललित गणेश चौधरी, उपसरपंच फरीद तडवी, ग्रामसेवक राहुल तायडे व अतुल भालेराव यांनी कृषी दुतांचे स्वागत केले.