धरणगाव (प्रतिनिधी) ‘संविधानाच्या सन्मानार्थ,आम्ही उतरलो मैदानात’ या भूमिकेतून आज संविधान बचाओ संघर्ष समितीचे भारतभर राष्ट्रव्यापी आंदोलनाचे दुसरे चरण नियोजित पद्धतीने धरणगावात पार पडले. यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी धरणगाव तहसील कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन करत धरणगाव तहसीलदारांना निवेदन देखील दिले.
संविधान बचाव संघर्ष समितीने प्रामुख्याने १२४ वे संविधान संशोधन बिल वापस घेणे, १०% आर्थिक आधारावर दिलेला आरक्षणाचा विरोध. तसेच ईव्हीएमच्या (EVM)संबंधित निवडणूक आयोगाला सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघनाच्या विरोधात पाच करोड स्वाक्षरी अभियान राबविले होते. याच पार्श्वभूमीवर संविधान बचाओ संघर्ष समिती,धरणगावच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.तसेच तहसिलदार यांना मागण्यांचे निवेदन निवेदन देण्यात आले. तहसिलदार यांच्यावतीने पंकज शिंदे यांनी निवेदनाचा स्वीकारले. यावेळी संविधान बचाओ संघर्ष समितीचे तालुका संयोजक औंकार माळी,निलेश पवार व लक्ष्मण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनुवादी प्रवृत्तीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. घटनेच्या चौकटीत न बसणारे आरक्षण देऊन लोकांची दिशाभूल करण्याचे काम हे शासन करत आहे. बहुजन समाजाला जर वेळेवर जाग आली नाही तर गुलामी स्वीकारावी लागेल,असे मनोगत व्यक्त केल. याप्रसंगी भारत मुक्ती मोर्चाचे प्रदेश सचिव मोहन शिंदे,संविधान बचाओ संघर्ष समितीचे तालुका संयोजक औंकार माळी,बामसेफचे तालुका अध्यक्ष पी.डी.पाटील,भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका अध्यक्ष निलेश पवार,संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष गोपाल पाटील,व्ही.टी.माळी सर,लक्ष्मण पाटील ,राहुल पवार,रविंद्र महाजन,मयूर भामरे,दीपक माळी,गौतम गजरे,किरण सोनवणे,प्रक्षिक निकम,आनंदराज पाटील,विजय माळी,राहुल पाटील,सिराज कुरेशी,सुरेश सोनवणे,सुनिल माळी,रिंकू पाटील,निवृत्ती माळी,नंदलाल माळी,सुनिल बडगुजर,राहुल सोनवणे,श्याम साळुंखे आदी मुलनिवासी बांधव उपस्थित होते. अतिशय शांततापूर्ण वातावरणात निवेदन सादर करण्यात आले. यावेळी धरणगाव पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.