मनवेल येथील पथदिवे ठरताय शोभेची वस्तू

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल गावात बसस्थानकासह मुख्यचौकात आणि विविध ठिकाणी लोकप्रतिनीधीच्या स्थानिक निधीतुन हायमास्ट लॅम्प (पथदिव्य) बसविण्यात आल्यामुळे रोशनाई निर्माण झाली असुन हे पथदिव्य बऱ्याच दिवसांपासुन बंद अवस्थेत पडुन असल्यामुळे शोभेची वस्तु बनले आहे.

मनवेल येथील बसस्थांनक परीसर सिध्दार्थ नगर थोरगव्हाण रोड व दगडी येथे तीन ठिकाणी आमदार तथा खासदार यांचा नीधीतुन बसविण्यात आलेले हायमास्ट लँम्प गेल्या एक ते दिड वर्षापासुन बंद असल्यामुळे चौक अंधारात असल्यामुळे हायमास्ट लँम्प शोपीस ठरत आहे. गेल्या काही दिवसापासुन किनगाव व परिसरात चोऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ होत असल्याने ग्रामस्थांमध्ये हायमास्ट दिव्य बंद अवस्थेत असल्याने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षे विषयी चिंता वाटु लागली आहे. 

एक ते दिड वर्षापुर्वी लोकप्रतिनीधीच्या नीधीतुन बसविण्यात आले असता हायमास्ट लँम्प देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही एक वर्षासाठी संबधीत ठेकेदार यांची असते व नंतर ग्रामपंचायतच्या माध्यमातून देखभाल व दुरुस्ती करावी लागत असते.मात्र असे असतांना याकडे ना ठेकेदाराचे लक्ष आहे ना ग्रामपंचायतचे यामुळे हायमास्ट लँम्प दुरुस्ती अभावी पडून आहे. 

गावातील स्ट्रीक लाईट असलेले विजेचे खांब यात अंतर असल्यामुळे गावातील मुख्यचौकात मोठ्या प्रमाणात अंधाराचे वातावरण पसरले आहे.बंद अवस्थेत असलेल्या हायमास्ट लँम्प त्वरीत दुरुस्ती करण्यात यावे अशी मागणी मनवेल ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे,

 

Protected Content