बुलढाणा – अमोल सराफ । लग्नाच्या रेशमी गाठींचे क्षण स्मरणीय करण्याकरता लग्नात कोणतीही कमी केली जात नाही, पण तुम्ही कधी हेलिकॉप्टरवर, बैलगाडीवर किंवा मोटारसायकलवर वराची वरात निघलेली बघितली असेल परंतू वधूची घोड्यावर बसलेली वरात पाहिली आहे का? चला पाहू या लाइव्ह ट्रेंड न्यूजचा विशेष रिपोर्ट …
दोन वर्षाच्या कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वकाही ठप्प झाले होते त्यातच लग्नकार्य जे धूमधडाक्याने साजरे होतात त्यावर निर्बंध आले होते पण आता काही प्रमाणात नियम शिथिल झाल्यामुळे पुन्हा एकदा बँडबाजे वरात मंडळी डिजेवर नाच गाणे पुन्हा एकदा दिसू लागले आहे आणि यातच बुलढाण्यातील खामगाव येथील विजयराव सांगळे व पुष्पा सांगळे यांची मुलगी समीक्षा हिचा विवाह प्रित्यर्थ तिचे तीची वरात चक्क घोड्यावर काढून एक आदर्श ठेवला आहे असे म्हणावे लागेल कारण विजयराव यांना दोन्ही मुली असताना आपल्याला मुलगा नाही याचं शल्य न ठेवता त्यांनी आपल्या मुलीची वरात घोड्यावरून काढली.
सांगळे व त्यांच्या पत्नी पुष्पा सांगळे यांना दोन मुली आहेत. दोन्ही मुली असल्याची त्यांना याचि खंत वाटली नाही व मुलगी असल्याची हिन भावना मनामध्ये येउ नये यासाठी त्यांनी चांगले संस्कार दिले व मुलींवर मुलाप्रमाणे प्रेम केले. त्यामुळे साहजीकच मुलीची वरात घोडयावरून निघावी असे स्वप्न नववधु समिक्षा हीच्या आई व वडीलांनी जीवनभर बाळगले होते. अखेर त्यांच्या मुलीची वरात रंमाजी नगर भागातून निघाली होती. त्यामुळे त्यांचे स्वप्न सत्यात उतरले वरातीत देखिल ९० टक्के महिलांची उपस्थिती होती. महिलांनी सुध्दा फेटे घालुन आनंद लुटला होता. मुलाच्या लग्नाच्यावेळी वराचे मित्र वरातीमध्ये डिजेयर धीरकतात त्याच प्रमाणे समिक्षाच्या वरातीत महिला थी रकल्या . दोन मुलगी असलेल्या कुटुंबियांनी सांगळे यांचा आदर्श समोर ठेवून मुलींना मुलाप्रमाणे वागवावे, समिक्षा ने परिचारीकेचे शिक्षण पूर्ण केले असून आपल्या पायावर उभे राहण्याची तीची इच्छा आहे.
आज मुला-मुलींमध्ये भेद नाही मुलगा मुलगी एक समान असे अनेक जनप्रबोधन केले जातात पण कृतीतून आदर्श सांगळे परिवार नी ठेवला आहे तो निश्चित कौतुकास्पद आहे असे म्हटल्यास वावग ठरणार नाही