स्थायी समितीत रस्त्याच्या दुर्दशेचा प्रश्न गाजला (व्हिडिओ)

WhatsApp Image 2020 01 10 at 6.31.48 PM

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे सर्वाना दिसतात मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ते दिसत नसल्याचा टोला शिवसेनेचे नितीन लढ्ढा यांनी लगविला. ते स्थायी सभेत बोलत होते. सभापती शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी स्थायी समिती सभा घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे, उपायुक्त अजित मुठे, लेखा परिक्षक संतोष वाहुळे, लेखाधिकारी कपील पवार, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.

नितीन लढ्ढा यांनी स्थायी सभेत शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेविषयी प्रश्न उपस्थित केला. यात त्यांनी काव्यरत्नावली चौक ते रामानंदनगर व गणेश कॉलनी ते कोर्ट चौक रस्त्याची अतिषय दुरावस्था झाली आहे. या रस्त्यारुन वाहने वापरत असल्यामुळे मोठ्याप्रमाणात धुळ उडते. या धुळीमुळे प्रत्येक घरात एक रुग्ण दिसून येत असून याभागातील रहिवास्यांना दरवाजे खिडक्या बंदकरुन घरात रहावे लागत आहे. नागरिक याबाबत व्यथा मांडण्यात येत आहे. परंतु, प्रशासनाकडून रस्तेदुरुस्तीसंदर्भात कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नितीन लढ्ढा यांनी केला. तसेच १५ दिवसात दोन्ही रस्त्यांचा प्रश्न मार्गी न लागल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी अमृतचे काम वेळेवर झाले असते तर, आज रस्त्यांची दुरवस्था झाली नसती असे भाजप नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील यांनी आरोप केला. याला विरोध करत विष्णु भंगाळे यांनी सत्ता तुमची होती तुम्ही प्रश्न मार्ग लावला पाहिजे होता, असे प्रतिउत्तर दिले. यावेळी राजेंद्र घुगे पाटील- विष्णु भंगाळे यांच्यात शाब्दीक चकमक उडाली.स्वच्छ सर्वेक्षणाच्या पहाणीसाठी समिती येणार म्हणून शहरात ८ दिवस चांगली साफसफाई होते. नंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. इंदौर शहराने स्वच्छतेचा दर्जा टिकऊन ठेवल्याने सलग तिसऱ्यांदा देशात प्रथम क्रमांकावर पटकविला आहे. आपण इंदौरचा आदर्श का घेत नाही, असा प्रश्न लढ्ढा यांनी उपस्थित केला. तसेच शामराव नगरमधील मनपाच्या जागेवर अनधिकृतपणे दुकाने बांधन्यात आले असून व्यावसायीक वापर होत आहे ही बाब मनपा अधिकाऱ्यांच्या लक्षात कशी येत नाही, अशी विचारणा लढ्ढा यांनी केली. दरम्यान, कुत्र्यांचे निर्बीजीकरणाचे काम एका एजन्सीला मनपाने दिले आहे. त्याच्यावर मॉनेटरींग कोणाचे आहे. किती कुत्र्यांवर शस्त्रक्रिया झाल्या हे कसे ओळखाल त्यासाठी व्हिडीओ रेकॉडींग करणे आवश्य असल्याचे सदस्य विष्णु भंगाळे यांनी सांगितले. तसेच मनपाकडे वाहने कमी आणि चालक जास्त असतांना चालक भरण्यासाठी जाहीरात काढण्यामागचा उद्देश काय अशी विचारणा सदस्यांनी केल्यानंतर साफसफाईच्या मक्तेदाराला अंतिम नोटीस दिली आहे.  त्यामुळे पर्यायी व्यवस्था उभी करण्यासाठी ही जाहिरात दिल्याचे आयुक्तांनी सांगितले. सभेत चर्चा झाल्ेल्या विषयांची अमलबजावणी करण्यात त्वरीत व्हावी, अशी सुचना सदस्या सदाशिव ढेकळे यांनी मांडली. एलईडीचे काम कधी सुरु होणार असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केल्यावर १९ जानेवारी नंतर दुरुस्तीच्या कामांना सुरुवात होणार असल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले.

 

Protected Content