भाजपा कामगार मोर्चातर्फे घरेलू महिला कामगारांना ई-श्रमदान कार्ड वाटप होणार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा आयोजित घरेलू महिला कामगारांची नोंदणी व कार्ड वाटप मेळावा सोमवारी दुपारी चार वाजता बालगंधर्व सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्या महिला घरेलू कामगार आहेत अशा महिलांना या ठिकाणी ई-श्रमदान कार्ड तयार करून दिले जाणार असून या महिलांच्या खात्यात शासनाकडून पैसे जमा केले जाणार आहेत.

या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी खासदार उमेश पाटील राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे, आमदार सुरेश भोळे, भाजपाच्या जिल्हा महानगर अध्यक्ष उज्वला बेंडाळे, भाजपा कामगार मोर्चाचे संघटन सरचिटणीस हनुमंत लांडगे, भाजपा कामगार मोर्चाच्या सरचिटणीस भाग्यश्री देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष मंगला भंडारी, प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार, ऍड. भूषण पाटील, प्रदेश सचिव वकिर्यालय मंत्री कामगार मोर्चाचे आशिष ढोमणे प्रदेश सचिव, विभागीय अध्यक्ष प्रताप शिंदे, विजया केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील-जाधव तसेच भाजपाचे सरचिटणीस अरविंद देशमुख उपस्थित राहणार आहे.

ज्या महिला घरेलू कामगार असतील अशा महिलांनी शिबिराच्या ठिकाणी आपले आधार कार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, फोटो आदींची झेरॉक्स घेवून उपस्थित रहावे असे आवाहन महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य सुधा काबरा, कुमार सिरामे, सुनिल वाघ कामगार मोर्चा महानगर अध्यक्ष यांनी केले आहे.

Protected Content