एसटी वाहकाचा सेवानिवृत्तीनंतर ग्रामीण भागात ठिकठिकाणी करण्यात आला सत्कार

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर आगारातील प्रामाणिक कर्तव्य दक्ष तसेच आदर्श एसटी वाहक असा नाव लौकिक असलेले दीपक आधार चौधरी हे प्रदिर्घ सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले,यानिमित्ताने त्यांचा ग्रामीण भागात ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला.

एसटी वाहक दीपक चौधरी यांची तब्बल ३२ वर्ष सलग लालपरी च्या माध्यमातून प्रवाशांशी नाड जुळलेली होती. प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त होत असताना ते भावनिक झालेले दिसून आले;त्याचे कारण ही तसेच होते. ते म्हणजे त्यांनी 32 वर्षाच्या सेवा काळात आपल्या लालपरिशी इमान राखत प्रवाशांना आपुलकीची वागणूक दिली.एसटी कंडक्टर म्हटले म्हणजे दिवसातून सतराशे वाद ठरलेले असतात. कधी तिकीटवरून तणावातून किंवा सुटे पैसे देण्यावरून होत असतात.परंतु दीपक चौधरी याला अपवाद ठरले आहेत.आयुष्यात आजपर्यंत त्यांचा प्रवाशांशी वाद झाल्याचे कधी दिसले नाही.असे नियमित प्रवास करणारे शालेय विद्यार्थी व नोकरी निमित्ताने ये-जा करणारे प्रवाशी सहज सांगतात.

नेहमी हसरा चेहरा शांत व संयमी स्वभाव अशी ओळख असलेले वाहक दीपक चौधरी लालपरीत गर्दी असताना स्वतःची जागा देखील अबाल वृद्ध तसेच प्रवाशी महिलांना देत असल्याची कबुली अनेकांनी दिली आहे.त्यांचा या दीर्घ कार्यकाळात,त्यांनी प्रवाशी बांधव तसेच अबाल वृद्ध विद्यार्थी दशेतील युवक युवती यांच्याशी नेहमी आपुलकीची वागणूक राहिली.त्यांच्या या चांगुलपणा मुळे कळमसरे,निम, कळली येथील ग्रामस्थांनी त्यांचा शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देवून सेवापुर्ती निमित्त यथोचित सत्कार करीत निरोप दिला. यात कळमसरे येथील सुप्रेडेंट अशोक चौधरी उपसरपंच जितेंद्र राजपूत पत्रकार गजानन पाटील,भानुदास चौधरी राकेश सुर्यवंशी व गावातील असंख्य गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार करीत निरोप दिला व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Protected Content