धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील वराड गावानजीक राष्ट्रीय महामार्गावर जळगावकडून एरंडोलकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विनोद वसंत कोळी (वय ४८), रा. जवखेडे (हिगोणे), ता. एरंडोल असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, एरंडोल तालुक्यातील जवखेडे येथे विनोद कोळी हे आपल्या परिवारासह वस्तव्याला होते. ते जळगाव महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरीला होते. रविवारी ड्यूटी संपवून काही खासगी कामासाठी बाहेरगावी गेले होते. काम संपवून ते दुचाकी क्रमांक (एम.एच.१९ डी.३७२६) ने जळगावला येण्यासाठी निघाले. धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावरून जात असतांना जळगावकडून एरंडोलकडे जाणारा ट्रक क्रमांक (एम.एच.०४ सी.आर ९९९९) हा भरधाव वेगाने येणून दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला हो