शनीपेठ पोलीस ठाण्याचे शोध पथकांची कारवाई
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे शाळेच्या पाठीमागील परिसरात बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला रविवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५ हजार रुपये किमतीचा गावठी पिस्तूल हस्तगत केला आहे. याप्रकरणी रात्री १०.३० वाजता असून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईश्वर रामा पारधी वय-२३ रा. धानोरा ता.जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
शनिपेठ पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे शाळेच्या पाठीमागील भागात संशयित आरोपी ईश्वर पारधी हातात गावठी पिस्तूल घेऊन परिसरात दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश टिकले, पोलीस हेडकॉन्स्टेबल परिष जाधव, राहुल पाटील, राहुल घेटे आणि अनिल कांबळे असे पथक तयार करून कारवाई करण्यासाठी रवाना केले. दरम्यान पथकाने कारवाई करत सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी ईश्वर पारधी याला अटक केली. त्याच्याकडून ५ हजार रुपये किमतीचा गावठी पिस्तूल हस्तगत केला आहे. या याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी ईश्वर रामा पारधी यांच्या विरोधात रात्री १०.३० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल परिस्थिती जाधव हे करीत आहे.