भवानी पेठेतील दुकान फोडून रोकड लंपास

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भवानी पेठ येथील सागर भवनजवळ असलेले दुकान फोडून दुकानातील ३८ हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सुमित राजकुमार मंडोरे (वय-३२) रा. गायत्री नगर, शिरसोली रोड जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांचे भवानी पेठेत सुधा इंटरप्रायजेस नावाचे दुकान आहे. शुक्रवार ८ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांनी त्यांचे दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून दुकानातील ड्राव्हर मध्ये ठेवलेले ३८ हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याचे उघडकीला आले. हा प्रकार शनिवारी ९ जुलै रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आला. त्यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे करीत आहे.

 

Protected Content