क्रीडा शिक्षकाना संच मान्यतेत घेण्यात येइल : गंगाधर मम्हाणे

अमळनेर (प्रतिनिधी) क्रीडा शिक्षकाना संच मान्यतेत सामाऊन घेणार तसेच माझ्या पातळी वरील प्रश्न निश्चितच पणे सुटतील. आपल्या विद्यार्थ्यांनी खेळामध्ये करियर करायला पाहिजे. सर्व खेळाडूना मान-सन्मान मिळत आहे. आर्थिक पाठबळ हि मिळत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे हा विषय दुर्लक्षित राहिला आहे. बरीचशी करणे मांडली जात नाहीत. आता सध्या कोणत्याही शारिरिक शिक्षकाला धक्का पोहचणार नाही व सरप्लस होणार नाही. अशी ग्वाही राज्याचे शिक्षण संचालक गंगाराम मम्हाणे यांनी दिली. शिर्डी येथे आयोजित शा. शिक्षण शिक्षकांचे राज्यस्थरीय महा अधिवेशन प्रसंगी ते बोलत होते.

 

तीन दिवसीय अधिवेशनाचा आज समारोप झाला.”शा शिक्षणाची गुणवत्ता व मूल्यमापन” या विषयावर गंगाधर मम्हाणे बोलत होते.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा उप संचालक सुहास पाटील म्हणाले कि” शिक्षण क्षेत्रामध्ये शारिरिक शिक्षणाचे स्थान अधोरेखित मानणारे आम्ही प्रशासक आहोत.शारिरिक शिक्षकांच्या पायावर क्रीडा संचलनालय अवलंबून आहे असे मानणारे आम्ही आहोत. क्रीडा स्पर्धा ह्या क्रीडा शिक्षकांच्या मनुष्य बळावरच अवलंबून आहे हि वस्तू स्थिती आहे क्रीडा क्षेत्र बांधून ठेवता कामा नये तुमच्यातला संघटक हा आमचा गाभा आहे.अनेक खेळाडू कष्ट करत आहे.त्यांना योग्य स्थान व चुकीचे काम करणार्यांचा पर्दाफाश करा.खेळाडू निवड करताना पारदर्शकता हवी.तुम्ही क्रीडा शिक्षक कर्तुत्व वान चळवळीतील कार्यकर्ते आहेत.असे समजून सचोटीने काम करा” .असे प्रतिपादन क्रीडा उप संचालक सुहास पाटील यांनी केले.या पूर्वी आयोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी सांगितले कि शिक्षण आणि क्रीडा मंत्री वेगवेगळे असायला हवे.

विश्वनाथ पाटोळे ,शिवदत्त ढवळे ,मेजर कुलथे ,नंदकुमार सूर्यवंशी यांनी शा शिक्षणाच्या बाबतीत भेडसावत असलेल्या समस्या बाबतीत मनोगत व्यक्त केले. या अधिवेशनात विविध मागण्यांसाठी ११ ठराव मांडण्यात आले.तत्पूर्वी सकाळच्या सत्रात महेश देशपांडे मेजर कुलथे , ज्ञानेश काळे ,राजेंद्र बनसोडे यांनी शालेय क्रीडा स्पर्धा मार्ग दर्शन या विषयावर प्रकट मुलाखत झाली यावेळी व्यासपीठावर आप्पासाहेब शिंदे , संध्या जिंतूरकर,चंद्रकांत पाटील ,सुवर्णा घोलप,राजेश जाधव ,प्रतिभा डबीर, , संजय पाटील, निलेश इंगळे,राजेंद्र जगदाळे ,महेंद्र हिंगे, ,राजेंद्र पवार,गणेश म्हस्के उपस्थित होते.सुत्रसंचलन राजेन्द्र कोहोकडे यांनी केले.आभार ज्ञानेश काळे यांनी मानले.

Add Comment

Protected Content