Home Cities जामनेर अपघातात मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबास शाळेने मिळवून दिली दीड लाखांची आर्थिक मदत

अपघातात मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबास शाळेने मिळवून दिली दीड लाखांची आर्थिक मदत


पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील पहूर येथील लेले नगर मध्ये राहणारा कै. रामेश्वर राजेंद्र सोनवणे हा विद्यार्थी आर.टी.लेले.हायस्कूल पहूर तालुका जामनेर येथे इयत्ता नववी मध्ये शिकत होता. दुर्दैवाने त्याचे अपघातात निधन झाले होते.

त्याच्या या निधनामुळे त्याच्या कुटुंबियांना पोहचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व्हावी म्हणून शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर.बी. पाटील, शाळेचे पर्यवेक्षक एस. व्ही. पाटील, शाळेचे मुख्याध्यापक एस. आर. सोनवणे, ज्येष्ठ लिपिक किशोर पाटील, कनिष्ठ लिपिक शरद पाटील यांनी प्रयत्न सुरू केले होते. या कामी संस्थेचे चेअरमन व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास-पर्यटन मंत्री गिरीष महाजन, संस्थेचे व्हॉइस चेअरमन साहेबराव देशमुख, दूध फेडरेशन जळगावचे संचालक अरविंद देशमुख तसेच माजी सभापती बाबुराव घोंगडे यांनी देखील खास पुढाकार व विशेष परिश्रम घेतले.

सदर मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला राजीव गांधी अपघात विमा योजना अंतर्गत दीड लाखाची रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून मंजूर करून आणून दिली आणि त्या विद्यार्थ्याला विमा सुरक्षा कवच मिळवून दिले. माणुसकीच्या सद् भावनेतून आणि या मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबास मदत व्हावी या सद् हेतूने या सर्वांनी जे अमूल्य सहकार्य केले, परिश्रम घेतले त्याबद्दल या सर्वांना व शाळेलाही पहूर परिसरातून सर्वत्र धन्यवाद प्राप्त होत आहेत.


Protected Content

Play sound