संसद सुरक्षेची जबाबदारी आता खास सैन्याकडे

नवी दिल्ली-वृत्तसेवा | संसद सुरक्षाभंगाप्रकरणी केंद्र सरकारडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता संसद सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफ कडे देण्यात आली आहे. महत्वाच्या ठिकाणी ही यंत्रणा असते. गृह विभागाच्या अखत्यारीत आता संसदेची सुरक्षा असणार आहे. याआधी संसदेची सुरक्षा दिल्ली पोलिसांकडे होती.

केंद्र सरकारने संसदेची सुरक्षा सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फॉर्स सीआयएसएफ कडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. सीआयएसएफ ही केंद्रीय लष्कर दलाची एक विशेष तुकडी आहे. सीआयएसएफ ही केंद्र सरकारच्या अनेक इमारतींची सुरक्षा करते. १३ डिसेंबर रोजी संसदेत सुरक्षाभंग झाला होता. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Protected Content