पुष्पक एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरला ; अनर्थ टळला

Pushpak train

 

मुंबई वृत्तसंस्था । इतगपुरी रेल्वे स्थानकात मुंबई-लखनऊ पुष्पक एक्स्प्रेसचा डबा घसरल्याने मुंबईहून मनमाडकडे जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. पुष्पक एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकात शिरत असताना गाडीचा वेग धीमा असल्याने मोठा नर्थ टळला आहे. या अपघातात कोणच्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे पाहून सर्व प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

पुष्पक एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरल्याची बातमी समोर आली आहे. एका डब्याचे चाक घसरल्याने मोठी हानी झालेली नाही. थोडक्यात मोठा अनर्थ टळला असून इगतपुरी रेल्वे स्थानकात हा डबा पूर्ववत करण्याचे काम सुरु आहे. मुंबईहून निघालेली पुष्पक एक्स्प्रेस इगतपुरी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनवर येत असताना या एक्स्प्रेसचा शेवटचा जनरल डबा रुळावरून घसरला. स्थानकात शिरत असताना या गाडीचा वेग धीमा होता. याच कारणामुळे हानी टळली आहे. ठाणे ते कल्याणदरम्यान असलेल्य पारसिक बोगद्याजवळ सीएमएमटीकडे येणाऱ्या रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाला तडे गेल्याने सीएसएमटीकडे येणारी मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. या मुळे सीएसएमटीकडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली. दरम्यान, दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना याचा काहीसा फटका बसला. दरम्यान, घसरलेला डबा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Protected Content