यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील दहिगाव येथील जागृत देवस्थान खंडेराव महाराज यांच्या यात्रोत्सवच्या निमित्ताने बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रम चोपडा येथील केतन पाटील भगत यांच्या सोबतीला दहिगावचे देवा झोपा पाटील या भक्ताने बारागाड्या ओढल्यात सौखेडा सिम या गावाच्या रस्त्यावर असलेल्या पिर बाबा यांच्या दर्ग्याजवळून खंडेराव महाराजांच्या मंदिरापर्यंत बारागाड्या ओढण्यात आल्यात बारा गाड्यांवर गावातील तरुणांनी बसून आनंद लुटला व खंडेराव महाराज की जय जय घोषाने सारा गाव दुमदुमून टाकला.
दरम्यान सकाळी गावातील सर्व देवतांची पूजा करण्यात आली यासाठी दहिगावचे लोकनियुक्त सरपंच अजय अडकमोल,उपसरपंच देविदास पाटील, प्रमोद चौधरी पुंडलिक पाटील,भिकन पाटील,शैलेंद्र पाटील,मयूर पाटील, कैलास पाटील, हेमा न्हावी, युवराज टेलर, समाधान चौधरी, दिलीप चौधरी, दीपक पाटील यांचे सह पिक संरक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी कर्मचारी यावल पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये,विनोद गोसावी, सुनील मोरे यांचे सह सर्व होमगार्ड बंधू यांनी शांतता राखण्यासाठी परिश्रम घेतले
दहिगाव येथे खंडेराव महाराज यात्रा निमित्ताने बारा गाडया ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात साजरा
10 months ago
No Comments