भुसावळ प्रतिनिधी | भाजपची महाजनादेश यात्रेचे ७ ऑगस्ट रोजी खानदेशात आगमन होणार असून भुसावळ येथे महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची बैठक आ. संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महा जनादेश यात्रा बोदवड तालुक्यातील घाणखेड येथे दिनांक 7 ऑगस्ट रोजी खानदेशात प्रवेश करणार असून या या यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. ही महाजनदेश यात्रा घाणखेड तालुका बोदवड येथे खानदेश मध्ये प्रवेश करणार आहे. जिल्ह्यातील खासदार आमदार घाणखेड येथे खान्देश प्रवेशद्वारावर या यात्रेचे स्वागत केले जाणार आहे. तसेच सायंकाळी सात वाजता बोदवड येथे स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला असून रात्री 8 वाजता जामनेर येथे भव्य सभा होणार आहे.
दिनांक 7 ऑगस्टला ही यात्रा भुसावळ येथे मुक्कामी थांबणार असून दिनांक 8 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर साडेदहा वाजता भुसावळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे, विजय चौधरी, युवराज लोणारी, मुकेश गुंजाळ, राजू नाटकर, अमोल इंगळे, दीपक भांडे, मुन्ना तेली आदींसह नगरसेवक व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.