नवी दिल्ली (प्रतिनिधी) यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज रविवारी संध्याकाळी ५ वाजता दिल्लीतील विज्ञान भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.
सहा ते सात टप्प्यात या निवडणुका होतील अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे. लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, सिक्कीम, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणाही होण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू होईल. दरम्यान, आता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे देशाचे लक्ष लागले आहे. एकंदरीत आज आज २०१९च्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, सिक्कीम, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणाही आजच होण्याची शक्यता आहे. मात्र, जम्मू-आणि काश्मीर विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबतच होईल किंवा कसे हे स्पष्ट झालेले नाही.