अंजनविहिरे-खामखेडा पुलाचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते भूमिपूजन

धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र व हिंदुस्थानचा सन्मान जगात वाढविण्याचे काम केले असुन शेतकरी व सामान्य मानसाचा बुलंद आवाज असणाऱ्या शिवसेनेच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन करून मतदार व जनतेने दिलेली जबाबदारी पुर्ण करत विकास कामांच्या माध्यमातून व्याजासह ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री, शिवेसना उपनेते गुलाबराव पाटील यांनी केले.

 

सहकार राज्यमंत्री, परभणीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यस्त वेळापत्रकात देखील जनसंपर्क व गाव भेटींचा कार्यक्रम सुरु ठेवला असुन धरणगाव तालुक्यातील अंजनविहिरे-खामखेडा गावांना जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन, अंजनविहिरे व बाभोंरी बु येथे जलशुद्धीकरण यंत्राचे उदघाटन, सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच 4 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करून या कर्मचाऱ्यांच्या पत्नीला जागतिक महिला दिनानिमित्त साडी-चोळी देवुन सन्मान करण्यात आले. परिसरातील ग्रामस्थांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व सर्व मान्यवरांचे ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत शाल श्रीफळ देऊन उत्स्फूर्त भव्य स्वागत व सत्कार केला.

 

या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन

 

अंजनविहिरे – खामखेडा रास्तावरील अंजनविहिरे गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे 2 कोटी 61 लक्ष , बांभोरी प्र .चा. – निमखेडी रस्त्याचे डांबरीकरण करणे 1 कोटी 10 लक्ष तसेच शासनाच्या मूलभूत सुविधेअंतर्गत सोनवद बुद्रुक, खामखेडा ,अंजनविहीरे येथे गावांतर्गत कॉंक्रिटीकरण व पेविंग ब्लॉक बसविणे तसेच बांभोरी प्र. चा.येथे फिल्टर प्लॅन्ट अश्या 4 कोटी 12 लक्ष्य निधीच्या विविध कामांचे भूमिपूजन सहकार राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

 

यावेळी राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण सर तसेच खामखेड्याच सरपंच रवी पाटील यांनी शिवसेनेच्या ध्येय धोरणावर व पक्ष प्रमुख मा.उद्धव साहेब ठाकरे यांच्या कार्य कर्तृत्वावर विश्वास ठेवून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी त्यांचा शाल श्रीफळ ,बुके व भगवा झेंडा देऊन ना. गुलाबराव पाटील व जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

सेवानिवृत्त व त्यांच्या सौभाग्यवतींचा ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार

 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून टेलिफोन विभागाचे अरुण रामलाल चव्हाण , उमविचे प्राध्यापक राजेंद्र अमृत पाटील, माध्यमिक शिक्षक हुकुम रामराव पाटील व सीआरपीएफ अंकुश रामसिंग पाटील या सेवानिवृत्त व्यक्तींचा व त्यांच्या सौभाग्यवतींचा तसेच शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक रजनीताई पाटील यांचा सहकार राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला.

 

सदर कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, तालुका प्रमुख गजानन पाटील,जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, प्रताप पाटील, संजय पाटील सर, पी .एम. पाटील सर, दीपक सोनवणे, सभापतीपती अनिल पाटील, प,स,सदस्य मुकूंद नंनवरे, प्रेमराज पाटील, आसाराम कोळी, पवन पाटील, सचिन पवार, जानकीराम पाटील, राजू पाटील, डी.ओ.पाटील , रवींद्र पाटील, व्ही. डी.पाटील, सुधाकर पाटील, दामू आणा पाटील,भाऊसाहेब पाटील, निर्दोष पाटील, विलास पाटील, प्रभाकर पाटील, हुशन भिल्ल , धोंडू भिल, शाखा प्रमुख गोकुळ पाटील,पोलीस पाटील जिजाबराव पाटील,तंटा मुक्त अध्यक्ष शिवाजी कुमावत, सचिन पाटील,रोहिदास पाटील, भाऊलाल भोई,पिंटू चांभार, नाना भोई गजानन नाना पाटील, सर्व परिसरातील सरपंच सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व संचालक शिवसेनेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विभाग प्रमुख सुधाकर पाटील यांनी केले तर आभार रविंद्र चव्हाण सर यांनी मानले.

Add Comment

Protected Content