रावेर नगरपालिका शाळेतील मतदान केंद्राला चक्क केळीचा बागेचा लुक

रावेर-लाईव्ह ट्रेंड न्युज प्रतिनिधी | राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. ग्रामीण भागामध्ये कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने विविध मतदान केंद्रांना वेगवेगळ्या स्वरूपात सजवण्यात आले आहे. केळीचा कोठार मानल्या जाणाऱ्या रावेरमध्ये एक मतदान केंद्र चक्क केळीच्या बागेच्या स्वरूपात सजवण्यात आले आहे.
रावेर मधील नगरपालिकेच्या शाळेत मतदान केंद्राच्या दाराच्या आत गेल्यावर मतदारांना आपण केळीच्या बागेत आलो आहे की काय असा भास होतो. रावेर लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्राला सुंदररित्या केळी आणि केळीच्या झाडांनी सजविण्यात आले आहे. कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. जळगाव केळीचा कोठार असून मतदारांमध्ये केळी पिकाबद्दल जागृती व्हावी, तसेच त्याचे आरोग्याला असलेले फायदे त्यांना कळावे. या दृष्टिकोनातून या मतदान केंद्राला अशा पद्धतीने सजवण्यात आल्याचे मत स्थानिक प्रशासनिक अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Protected Content