जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | परिवर्तन जळगाव आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन आयोजित परिवर्तन मित्र महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नागपूर येथील मीराकी थिएटर निर्मित बिखरे बिंब या हिंदी नाटकात च्या प्रयोगाचे आयोजन भाऊंच्या उद्यानात करण्यात आले होते. मूळ लेखक गिरीश कर्नाड यांच्या नाटकाचे हिंदी सादरीकरण नागपूरच्या कलावंतांनी केले. नाटक मेहक त्रिपाठी यांनी प्रमुख भूमिका केली. अतुल आढे यांनी दिग्दर्शन व अभिनय केला. निकिता धाकुलकर, अक्षय खोब्रागडे, दुर्गेश कुहीके, अजय पाटील, अक्षय नेहे, विकास वाघ, प्रवीण पाटील यांनी नेपथ्य प्रकाश योजना रंगमंच व्यवस्था सांभाळली.
याप्रसंगी प्रसिद्ध कायदेतज्ञ नारायण लाठी, उद्योजक युसूफ भाई मकरा, ज्येष्ठ रंगकर्मी शरद पांडे, संजय निकुंभ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मकरा यांनी परिवर्तन व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन च्या उपक्रमाचे कौतुक करून कलेला प्रोत्साहन मिळत असल्याचे मत व्यक्त केले. महोत्सव प्रमुख स्वरूप लुंकड, नंदू अडवाणी, विनोद पाटील, यांनी कलावंतांचे स्वागत केले. यावेळी प्रयोगानंतर प्रेक्षकांनीही आपल्या प्रतिक्रिया देऊन कलावंतांशी संवाद साधला तर सूत्रसंचालन प्राध्यापक मनोज पाटील यांनी केले.
मैत्रमहोत्सवात आज सोमवार संध्याकाळी साडेसहा वाजता महावीर क्लास गणेश कॉलनी येथे सांस्कृतिक विश्व माध्यम यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे या चर्चासत्राला प्रेक्षकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन परिवर्तन व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे