बारामतीची जागा कोणाचा साताबारा नाही; असे म्हणत विजय शिवतारे यांनी उमेदवारी केली जाहीर

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूका लवकरच जाहीर होणार असून बारामती लोकसभेला अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे. त्यातीलच आता महायुतील नेत्यांनी अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघात उमेदवारीची घोषणा केली आहे. शिवेसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे हे बारामतीमधून लोकसभा निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. त्यामुळे बारामती येथील लोकसभेत निवडणूकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. यावेळी शिवतारे म्हणाले की बारामती मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही आहे. देशातील ५४३ पैकी एक मतदारसंघ आहे. येथे मालकी कोणाची नाही. म्हणून पवार-पवार करण्याऐवजी आपण आपला स्वाभीमान जागृती करून लढायचं आहे. या दरम्यान विजय शिवतारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीकाही केली.

2019 च्या निवडणुकीमध्ये मी त्यांच्या मुलाविरोधात प्रचार केला पण तो राजकारणाचा भाग होता, निवडणुकीत कर्तव्य म्हणून केलं होतं. त्यात काहीच वैयक्तिक नव्हतं. पण अजित पवार यांनी नीच पातळी गाठली. मी २३ दिवस रुग्णालयात होतो, ट्रीटमेंट सुरू असतानाही मी अँब्युलन्समधून प्रचार केला. तेव्हा पालखी जाणार, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. मरायला लागलात तर कशाला निवडणूक लढवताय ? तुम्ही खोटं बोलताय, लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे खोट बोलत आहात, असा गलिच्छ आरोप त्यांनी केला. माझ्या गाडीचा नंबर, कोणत्या कंपनीची गाडी इथंपर्यंत अजित पवार खालच्या थरापर्यंत आले. तु कसा पुढे निवडून येतोस तेच मी बघतो. महाराष्ट्रात मी कोणाला पाडायचं ठरवलं तर मी कोणाच्या बापाचं ऐकत नाही, मी पाडतो म्हणजे पाडतोच असेही अजित पवार म्हणाल्याचा आरोप शिवतारेंनी केला.

Protected Content