विजय वडेट्टीवार यांनी केला शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : भाजपची कारवाईची मागणी

मुंबई प्रतिनिधी | राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला असून, या संदर्भात ठाकरे सरकारने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मंत्री विजय वडेट्टीवार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना दिसत आहेत. हा व्हिडिओ चंद्रपूरमधील राजूरा येथील असल्याचा दावा केशव उपाध्ये यांनी केला आहे. त्याचवेळी त्यांनी वडेट्टीवार हार घालताना पुतळ्याच्या भागावर पाय ठेऊन उभे होते, असेही म्हटले आहे. याच घटनेवरुन मुख्यमंत्री वडेट्टीवार यांच्यावर कारवाई करणार का, असा प्रश्नही उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.

महाआघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान. चंद्रपुर राजूरा येथे पुतळ्यावर हार घालण्यासाठी पुतळ्याचा भागावरच पाय ठेवला उद्धव ठाकरे काय ऍक्शन घेणार वडेवट्टीवारांवर की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार?, अशी विचारणा व्हिडिओ शेअर करताना केशव उपाध्ये यांनी केला आहे.

दरम्यान,  विजय वडट्टेवार यांनी  आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला नाही. भाजपमधील काही नेते खोडसाळपणे या प्रकरणात माझं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.आपल्या मातृ संघामध्ये ज्यांनी ५० वर्षे छत्रपती शिवरायांचा फोटो लावला नाही त्यांनी आम्हाला शिकवू नये, असे पलटवार  वडेट्टीवार यांनी केला आहे.

 

 

Protected Content