यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील डोणगाव येथे सालाबादाप्रमाणे यंदाही श्री खंडेराव महाराज देवस्थानाची यात्रा मोठ्या उत्साहात गुरुवार, दि. १३ रोजी पार पडणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून, दरवर्षी होळीच्या दिवशी या पवित्र सोहळ्याचे आयोजन केले जाते.
श्री खंडेराव महाराज हे डोणगाव ग्रामस्थांचे ग्रामदैवत असून, यात्रोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हालेलं असतं. श्री खंडेराव महाराजांचे भव्य मंदिर यात्रेनिमित्त विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे.
यावर्षी यात्रेच्या निमित्ताने गोंधळ सम्राट सचिनभाऊ व दिनेशभाऊ बेटावदकर यांच्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी आई एकविरा गृप, गुरु मित्र मंडळ, शिवराजे मित्र मंडळ, छत्रपती शासन गृप, सम्राट गृप, सर्व महिला बचत गट, स्वप्नातील डोणगांव गृप, रॉयल फौजी, योगेशभाऊ पाटील मित्र परिवार व ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.