पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतर असलेले म्हसवे येथे जंजनी मातेचा अष्टमीला यात्रा उत्सव गुढीपाडव्यापासुन वासंतिक नवरात्र उत्सव संपुर्ण महाराष्टात मोठ्या उत्सावात साजरा केला जातो. त्यात भक्ताचे सर्व मनोकमाना पुर्ण करणारी देवी म्हणून जंजनी माता हे अराध्य दैवत याची परिसरात ओळख आहे. असे जंजनी मातेच मंदीर हे एकमेव असुन या व्यतिरीक्त राजस्थान येथे असे एक मंदीर आहे. यामातेची आख्याकिका प्राचीन काळात महिषासुर चा वध करण्यासाठी देविला भवानी रूप घेणे आवश्यक होते. त्यासाठी भक्ताचा उध्दार करण्यासाठी जजंनी माता स्वयंभू मूर्ती म्हसवे येथे मंदिरात विराजमान झाली आहे.
मंदीराची रचना हेमांड पंथी आहे. मंदीर सुमारे ४०० वर्षापुर्वीचे बांधीव आहे. मंदीर अहिल्याबाई होळकर याचा हाताने बांधकाम झाले असल्याचे आज पण तेथे तश्या खुणा व आठवणी दिसतात. तसेच आज रोजी नविन मोठे मंदीर बांधकाम झाले आहे. मंदीर समोर २ दोन दिपमाळा म्हणजे हलते मनोरे आहेत. मनोर बांधकाम समोर हे सिमेंट अगर लोखडात नसुन चुण्यात बाधकाम असुन त्याचे उंची सुमारे ५० फुट असुनं सष्ठाकोनी बांधकाम केले आहे. एक मनोऱ्यावर बसुन दुसला मनोरा हलवल्यास तो हलवला जातो व त्याचे आज पर्यंत तसेच बांधकाम आहे. ते देविची कृपा व श्रध्दा म्हणुन पाहीले जाते
मदिराचा लगत उत्तर दिशेस एक मोठा चौकनी तलाव असुन त्यात मोठया प्रमाणात बारा महीने पाणी असेते त्यात भाविक मोठया प्रमाणात आघोंळ करतात. येथे नेहमी पर्यटक येत असतात. याठिकाणी नेहमी आपले नवस फेडण्याकामी व शांत व निर्सग रम्य असे परीसर असल्याने मोठ्या प्रमाणे नागरीक नेहमी वर्दळ असते. तालुक्यातील कोणत्याही सार्वजनीक निवडणुक याचे प्रचार नारळ फोडण्यासाठी येथे नेहमी कार्यकर्त येथे येत असतात. अश्या नवसाला पावणारी जंजनी मातेची यात्रोत्सव चैत्रशुध्द अष्टमी म्हणजे दि.१६/४/२०२४ मंगळवारी असुन मंदीर राष्ट्रीय महामार्ग-६ लगत असुन पारोळ्या पासुन जळगाव कडे जाताना ३ किमी अंतरावर आहे. यात्रे निर्मीत मिरवणुक, आरती, रात्री तमाशा, कुश्त्या असे विविध कार्यक्रम दिवस भर सुरु असतात. मोठ्या प्रमाणात व्यवसायीक, मिठाई, खेळणी, फुगे, झुले, पाळणे आदी दुकान थाटलेले असतात. व मोठ्या प्रमाणात गर्दी असते.