अमळनेर रेल्वे स्थानकावर आता ओखापुरी एक्सप्रेस थांबणार

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर रेल्वे स्थानकावर माजी आमदार शिरिष चौधरी यांचा मागणीनुसार ओखा पुरी एक्सप्रेस गाडीला अमळनेर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

शहरातील प्रवासी बांधवांची गौरसोय लक्षात घेवून रेल्वे मंत्रालयाचा प्रवासी सेवा समितीने ४ सप्टेंबर रोजी भेट दिली होती. त्यास अनुसरून माजी आमदार शिरिष चौधरी यांनी समितीचे डॉ.राजेंद्र फडके आणि सदस्यांचा समक्ष अमळनेर रेल्वे स्थानकांवरील विविध समस्यांचा पाढा समितीपुढे वाचत लवकरात लवकर त्यांचे निरसन करण्याची मागणी केली होती. त्यात प्लॅट फॉर्म क्र.1 व 2  मधील अंतरामुळे प्रवासींना होणारी गैरसोय, दैनंदिन प्रवासी पास सुरू करावी, mst पास पुन्हा सुरू करावे यासह विविध एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा, ग्रामीण रुग्णालय जवळून रस्त्यास मान्यता द्यावी, अश्या विविध मागण्या ४ सप्टेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.

अनुसरून नुकतीच रेल्वे विभागाचा वतीने  08401/08402 ओखा पुरी एक्सप्रेस गाडी अमळनेर येथे थांबवावी असे नुकतेच आदेश पारित झाले. असल्याने माजी आमदार  शिरिषदादा चौधरी यांनी रेल्वे वरिष्ठ अधिकारी तसेच रेल्वे प्रवासी सेवा समितीचे डॉ.राजेंद्र फडके तथा सर्व सदस्याचे आमदार शिरीष दादा चौधरी मित्र परिवार आघाडीच्या वतीने आभार मानत उर्वरित मागण्याची देखील दखल घेत निरसन करावे अशी देखील विनंती केली आहे.

 

Protected Content