लाडकी बहिण योजनेचा पुढचा हफ्ता ‘या’ दिवशी येणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची राज्यातील सर्व पात्र महिला वाट पाहत आहेत. या महिलांसाठी खुशखबर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. डिसेंबरची रक्कम हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर दिली जाईल, असं फडणवीस म्हणाले होते. तसेच लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले होते.

त्यानुसार आता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार आहे. आजपासून पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत. हिवाळी अधिवेशन संपून डिसेंबर महिनाही संपत आला आहे. मात्र राज्याच्या लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे कधी येणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, आजपासून पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे.

लाडकी बहिन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत. दिवाळीपूर्वी जुलै ते नोव्हेंबर या काळात महायुती सरकारने महिलांच्या खात्यात 7,500 रुपये जमा केले. यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि आचारसंहिता लागू झाली. या वेळी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज केलेल्या पात्र महिलांनाही योजनेचे सर्व हप्ते मिळणे अपेक्षित आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेतून महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पानंतर लाभार्थी महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या लाभार्थी महिलांना डिसेंबरचा हप्ता म्हणून केवळ 1500 रुपये दिले जाणार आहेत.

Protected Content