जामनेर (प्रतिनिधी) विज उपकेंद्राच्या निकृष्ट कामाची बातमी छापल्याचा राग आल्याने केकतनिंभोरा येथील सरपंच पतीने पत्रकारास मारहाण केल्याप्रकरणी जामनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, जामनेर-जळगाव रोडवरील केकतनिंभोरा या गावात विज वितरण कंपनीच्या विज उपकेंद्राचे काम सुरू आहे. सदरचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याने येथील पत्रकार सागर ज्ञानेश्वर लव्हाळे यांनी वृत्तपत्रात सदर कामाची बातमी छापली. याचा राग सरपंच पती-दिपक अभिमन्यू पाटील यांनी आला. विशेष म्हणजे सुरू असलेले काम ग्रामपंचायत अखत्यारीत नसून तसेच सदर कामाचा ठेका येथील सरपंच पती-दिपक अभिमन्यू पाटील यांनी घेतलेला नसतांना त्यांनी पत्रकार-सागर लव्हाळे यास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.
सदर घटनेचा जामनेर पत्रकार बांधवांनी निषेध नोंदवत सरपंच पती-दिपक पाटील यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, यासाठी जामनेरचे तहसीलदार-नामदेव टिळेकर तसेच पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक-विकास पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी पत्रकार-लियाकत सैय्यद, किरण सोनवणे, दादाराव वाघ,रविंद्र झाल्टे,सुनील इंगळे, अभिमान झाल्टे,मिलिंद लोखंडे, अरुण तायडे,प्रल्हाद सोनवणे, किशोर कुमावत,गिरीष चौधरी, पंढरी पाटील,सुनील नेरकर, गजानन तायडे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.