रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

0rail1

 

पाचोरा/भुसावळ (प्रतिनिधी) आज भुसावळ येथे झालेल्या रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत सदस्यांनी विविध समस्यांचा पाढा डीआरएम व रेल्वे अधिकाऱ्यांसमोर वाचला. यावेळी विविध मागण्या देखील करण्यात आल्या.

 

आज बुधवारी सायंकाळी 5 वाजता बैठक संपन्न झाली. यावेळी पाचोरा येथील स्थानिक समस्या रेल्वे सल्लागार तथा ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पाटील व चाळीसगाव येथील समस्या पराग बढे यांनी डीआरएम साहेब व अधिकारी वर्गासमोर प्रवाशांच्या समस्या मांडल्या. यावेळी सर्व समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रशासन कटीबद्द असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. पाचोरा व चाळीसगाव स्टेशन वरील काही बदल, मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात याबाबत श्री.पाटील व श्री.बढे या दोघांकडून सूचना देखील भुसावळ विभागाला लिखित स्वरूपात देण्यात देण्यात आल्या.

 

या मागण्यांमध्ये प्रामुख्याने भुसावळ ते मनमाड दरम्यान डेमु/मेमु ट्रेन सुरू करून मिळावी, गीतांजली एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्स्प्रेसला , पाचोरा, अप पवन एक्स्प्रेसला पाचोरा, महाराष्ट्र एक्स्प्रेसला नगरदेवळा थांबा मिळावा. तसेच पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेसला अतिरिक्त 2 AC तर 4 आरक्षित बोग्या वाढवून मिळाव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या. एवढेच नव्हे तर, मागण्यांचे निवेदन दिल्लीपर्यंत पोहचविण्याच्या सूचना दिलीप पाटील यांनी केल्यात. या बैठकीला DRM साहेब, अधिकारी वर्ग, सर्वच रेल्वे सल्लागार सदस्य उपस्थीत होते.

Protected Content