जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या महामारीमुळे होणाऱ्या मृत्यूप्रसंगी कोणत्याही समाजाच्या नागरिकाला दवाखानापासून वैकुंठ धामपर्यंत शववाहिका किंवा ॲम्बुलन्स तसेच सरपणासाठी पैसे किंवा इतर कामासाठी पैशाची गरज भासल्यास त्यांनी जळगाव शहरातील खालील व्यक्तींशी अथवा जळगाव मुस्लिम कब्रस्थान व ईदगाह कार्यालय, अजिंठा चौक ,जळगाव येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. .
कोणत्याही समाजाच्या अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम समुदाय मधील मजीद राणानी, गफ्फार मलिक, फारूक शेख, जफर शेख( पिंच) हाजी मुख्तार ठेकेदार, इद्रीस हिंगोरा( आदर्श रोड लाईन्स) बशीर बुर्हानी व रफिक पटणी (आरको) हे व्यक्तिगत आपल्या स्वतःचे पैसे संबंधितांना देणार आहे. तरी यापुढे पैशाअभावी अंत्यसंस्कार रखडले जाऊ नये म्हणून किंवा ॲम्बुलन्स साठी त्याला पैशाची आवश्यकता भासू नये म्हणून त्यांनी मुस्लिम इदगाह कब्रस्तान येथे दूरध्वनी क्रमांक ९४२३१८५७८६ किंवा ९३७३७०७७३६ या वर संपर्क साधावा असे आवाहन फारुक शेख जनरल सेक्रेटरी मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्ट, जळगाव यांनी यांनी एका पत्रका द्वारे केलेले आहे.