यावल प्रतिनिधी । शहरातील नुकत्याच सराफ व्यवसायिकाच्या दुकानात चोरट्यांनी दरोडे टाकला असून याप्रकरणातील गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल तालुक्यातील अंजाळे शिवारातील तापी नदीचे खोर्यात आढळून आली आहे. पोलिसांनी मोटरसायकल ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणून लावली आहे.
येथील बाजीराव काशिदास कवडीवाले यांचे सराफा पेढीवर सात जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी देशी कट्ट्याचा धाक दाखवू ५५ हजार रुपयाचा रोकडसह साडेअकरा लाख रुपयांचे सोन्याच्या दागीने दरोडेखोरांनी लंपास केले होते.
येथील शहरातील मुख्य बाजारपेठेतील कोर्ट रोड वरील बाजीराव काशिदास कवडीवाले यांचे सराफा पेढीवर सात जुलै रोजी अज्ञात चार चोरट्यांनी एका पल्सर गाडीवर येऊन दुकान मालकाला देशी कट्ट्याचा धाक दाखवून ५५ हजार रुपये रोकडसह साडेअकरा लाख रुपयाचा ऐवज लंपास केला होता.
या प्रकरणाचा स्थानिक पोलीस यंत्रणेसह जिल्हा पोलिस यंत्रणा तपास करीत आहे. दरम्यान सोमवारी रावेर येथील विशेष गुन्हा शाखेचे हेड कॉस्टेबल महेंद्र सुरवाडे व कुणाल सोनवणे यांना अंजाळे शिवारातील तापी नदी चे खोऱ्यात एक मोटर सायकल पडलेली असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून येथील पोलिस निरीक्षक सुधीर पाटील हेडकॉन्स्टेबल संजय तायडे, असलम शेख ,सुशील घुगे अशा यावल आणी रावेर पोलीसांच्या संयुक्त पथकाने जाऊन खोऱ्यातून मोटरसायकल काढून यावल येथील पोलिस ठाण्यात आणली आहे.
ही मोटरसायकल अंजाळे शिवारातील तापी नदीच्या परिसरातील काठावरील निर्मनुष्य व दाट झाडी मध्ये फेकून दिलेली होती गुन्ह्यात हीच मोटर सायकल वापरली असल्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी पत्रकारांना सांगितले तर पोलीसांचा तपास हा योग्य दिशेने सुरू असुन लवकरच या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडतील असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला