गोलाणी मार्केटमधून महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाईल लांबविला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट मधील डिलाईटरोडवर महिला पोलीस अधिकाऱ्याचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवारी २५ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री १० वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, योगिता गबरू राठोड रा. पोलीस मुख्यालयाच्या बाजूला सातपुवडा बिल्डींग दक्षता नगर, जळगाव ह्या जळगाव जिल्हा पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. काल रविवार २५ जुलै रोजी दुपारी १२.१५ ते १२.३० वाजेच्या दरम्यान शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील डिलाईट शॉप समोरील रोडच्या बाजूला मुलाचा वाढदिवसानिमित्त केक घेण्यासाठी कुटुंबियांसह आलेल्या होल्या.  त्याच्या चारचाकी वाहत त्यावेळी त्यांच्याकडे त्याचा १७ हजार रूपये किंमतीचा महागडा मोबाईल होता. अज्ञात चोरट्यांनी त्यांचा महागडा मोबाईल चोरून नेल्याचे उघडकीला आल. आजूबाजूला परिसरात शोधाशोध केली परंतू मोबाईल आढळला नाही. रविवारी रात्री १० वाजता महिला पोलीस उपनिरीक्षक योगिता राठोड यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे. 

Protected Content