मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था | दाक्षिणात्य सिनेमाचे दिग्दर्शक मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला ‘पोन्नियिन सेल्वन‘ या बहुचर्चित सिनेमाचा टीझर नुकताच आऊट झाला असून लवकरच हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये ऐश्वर्या रायचा राजेशाही लूक प्रेक्षकांना पाहायला मिळत असून हा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ५०० कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून प्रेक्षक प्रतीक्षा करत असलेला हा आजवरचा सर्वात महागडा सिनेमा असणार आहे. टीझरमध्ये मोठ-मोठे जहाजं, हत्ती-घोडे आणि आलिशान बंगले यासह विक्रम, किच्चा सुदीप आणि जयम रवी हे अभिनेते दिसून येत आहेत. आहे.
१९९५ साली कल्कि यांनी लिहलेल्या तमिळ कादंबरीवर आधारित असलेल्या या सिनेमाचे नुकतेच पाच भाषांमध्ये टीझर रिलीज करण्यात आला असून हा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत सिनेमा प्रदर्शित होणार आहे. लाइका प्रोडक्शन आणि मद्रास टॉकीजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून दि. ३० सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.