चतुर्थश्रेणी कर्मचारींच्या उपहारगृहाचे उदघाटन उत्साहात संपन्न

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील तहसील कार्यालयात जळगांव जिल्हा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेव्दारे संचलीत उपहारगृह उदघाटन फैजपूर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावल येथील महसुल प्रशासनाच्या सातोद मार्गावरील नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या मोकळ्या जागेत उपविभागीय अधिकारी फैजपूर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले. दीपप्रज्वलन यावलचे तहसीलदार महेश पवार, नायब तहसीदार आर.डी.पाटील, फैजपूर प्रांत कार्यालयाचे कारकून रशीद तडवी, कास्टाईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र तायडे यांचे हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी स्वागत कैलास कडलग यांचे स्वागत महसूल चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष डी. एम.अडकमोल, तहसीलदार महेश पवार यांचे स्वागत उपहारगृह अध्यक्ष सुरेश महाले, नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांचे स्वागत महसूल संघटना यावल तालुका सरचिटणीस युनूस खान यांनी केले, जिल्हा सरचिटणीस रशीद तडवी यांचे स्वागत शेख नूर यांनी केले तर महसूल संघटना यावल तालुकाध्यक्ष रहेमान तडवी, डी.एम.अडकमोल यांचे स्वागत रामलाल कोळी यांनी केले.

या कार्यक्रमास सुरेश महाले बी.के.पाटील. पुलकेशी केदारी, बापू साळुंखे, संजय तायडे, यावल तालुका पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी नईम शेख यांच्यासह यावल निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, पुरवठा निरिक्षक अंकिता वाघमुळे, सखावत तडवी, दीपक बाविस्कर, सुरज जाधव व सर्व महसुल कर्मचारी यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

Protected Content