रावेर, प्रतिनिधी | शिर्डी येथे दि. ३१ जुलै रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय संमेलनाला तालुक्यातून सरपंच व उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात तालुक्यातील सरपंचांची एक बैठक आज (दि.२२) येथे संपन्न झाली. येथील कृषी उपन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सरपंच संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष श्रीकांत महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष जगदीश पाटील, उपाध्यक्ष कविता बगारे, सचिव महेंद्र पाटील, के-हाळा सरपंच राहुल पाटील, खिरवळ सरपंच निळकंठ चौधरी, अटवाड़े गणेश महाजन, भातखेड़ा सरपंच कैलास पाटील, अजंदे सरपंच सौ. रेखा पाटील, कळमोदा सरपंच सौ. सरला पाटील, कुर्बान तडवी, लताबाई बोंडे, सौ. शितल जोगी, सौ. सवीता गाढे, महेंद्र पाटील, सौ. विजया चौधरी, दिनकर पाटील, गणेश चौधरी, सौ. दिपाली कोळी, मनोज वाघ, आर.एल. महाजन, रितेश परदेशी, सौ. कविता पाटील व सुनिता तायडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.