पाचोरा येथे राष्ट्रीय संघर्ष समितीचा मेळावा उत्साहात

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा येथील विठ्ठल मंदिरात एनसीएचे ज्येष्ठ नेते अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली (EPS-95) राष्ट्रीय संघर्ष समितीची बैठक विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी व कामगारांच्या उपस्थितीत नुकतीच आयोजित करण्यात आली होती.

या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविसिंग जाधव, जळगाव जिल्हा अध्यक्ष अरविंद भारंबे, जिल्हा सचिव रमेश नेमाडे हे उपस्थित होते. इंजिनिअर नंदलाल बोदडे यांची ईपीएस -९५ राष्ट्रीय संघर्ष समिती पाचोरा तालुका अध्यक्षपदी तर दिलीप झोपे (जिल्हा बँक) यांची तालुका सचिव पदी निवड करण्यात आली. उर्वरीत कार्यकारीणी लवकरच जाहीर करण्यात येणार असुन या मेळाव्याचे प्रसंगी सर्व  मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. याच मेळावा प्रसंगी मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी पाचोरा यांना सादर करण्यात आले. पाचोरा येथील पहिल्याच सभेला १५० ते २०० पेंशन धारक उपस्थित होते.

 

Protected Content