यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील मनवेल गावात एका विवाहीत तरूणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे याबाबत पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पुष्पा जितेंद्र कोळी, वय २५ वर्ष (रा.मनवेल ता. यावल) या विवाहीत तरुणीने २२ जानेवारी सोमवार रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील छताच्या लाकडी दांडयाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेण्याचा स्थितीत आढळून आल्या. त्यानंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेत तात्काळीने यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुष्पा कोळी यांची तपासणूक केली आणि त्यांना मृत घोषित केले.
मयत तरुणीचा भाऊ देविदास जितेन्द्र कोळी यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉस्टेबल सिकंदर तडवी हे करीत आहे.तरुणीने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलेले याची माहिती अदयाप मिळू शकली नाही. दरम्यान तरूणी मागील तीन वर्षापासून आपल्या पतीपासुन घटस्फोट घेऊन आपल्या माहेरी राहत असल्याची माहिती समोर आली आहे. तरूणीने केलेल्या आत्महत्या मुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.