महावितरण कंपनी आता आकाशवाणीवरून जनजागृती करणार


औरंगाबाद (वृत्तसंस्था) महावितरणची वीज ग्राहकांकडील थकबाकी शुन्य करण्यासाठी व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे. ग्राहकांना आपली वीज बिले ऑनलाईनद्वारे भरण्यासाठी प्रोत्साहन मिळावे. महावितरणचा संदेश ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी एफएम रेडिओ, आकाशवाणी, लोकल चॅनलद्वारे मनोरंजनातून जनजागृती करण्यात येत आहे.

आधुनिक स्पर्धेच्या युगात महावितरण वीज ग्राहकांना सतत नाविन्यपूर्ण सेवा देण्यास सदैव तत्पर आहे. वीज ग्राहकांकडे कोटयवधी रूपयांची वीज बिलाची थकबाकी आहे. वीज ग्राहकांनी दरमहा चालू बिलासह वीज बिले ऑनलाइन भरावीत. यासाठी महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री ओम प्रकाश बकोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या ग्राहकाभिमुख सेवा अधिकाधिक वीज ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी एक पाउल टाकले आहे. मराठवाडा व खानदेशात आकाशवाणी व एफएम रेडिओच्या माध्यमातून आता रांगेत उभे राहून वीज बिल भरण्याचे दिवस संपले, इंटरनेट, मोबाईल अॅपसह इतर ठिकाणाहून बिल भरण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध, महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर नोंदणी करून वीज बिल भरा, अन 10 रूपये गो ग्रीनची सुट मिळवा. वीज बिल भरा, सहकार्य करा. अशा आशयाची जाहिरातद्वारे संदेश मनोरंजनातून, जनजागृती करण्यात येत आहे.

वीज बिल भरण्यासाठी क्रेडीटकार्डचा वापर , मोबाईल वॉलेट, नेटबॅंकींगसह इतर माध्यमातून वीज बिल भरण्यासाठी कोठेही रांगेत उभे राहण्याची गरज नाही. मोबाईलद्वारे घरबसल्या वीज बिल भरता येईल. आपले वीज बिल आलेच नाही, याची वाट पाहावी लागणार नाही. महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर ग्राहक क्रमांक टाकून चालू महिन्याचे वीज बिल पाहता येईल. व तात्काळ वीज बिल भरता येईल. तसेच महावितरणच्या सेवा अॅपवरही उपलब्ध करून दिल्या आहेत. महावितरणचे मोबाईल अॅप डाउनलोड करून त्यावरून आपले वीज बिल पाहता येईल. तसेच मोबाईल अॅपवरून स्वत:चे मीटर रिडींगही पाठवता येईल. त्याच बरोबर वीज खंडित होण्याची पूर्व सूचना व नवीन वीज मीटर नोंदणीसह इतर सेवाही घरबसल्या ठिकाणहून घेता येतील. वीज ग्राहकांनी आपले चालू व थकीत वीज बिले दरमहा ऑनलाईनद्वारे भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.

Add Comment

Protected Content