यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरातील विस्तारित भागात गंगेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी रविवारी कावड यात्रा काढण्यात आली. अंजाळे येथील तापी नदी पात्रातून पुजा अर्चना झाल्यानंतर पवित्र जल घेऊन अंजाळे येथील श्री अर्जुनेश्वर महादेव मंदिरापासून ते यावल येथील गंगेश्वर महादेवपर्यंत महादेव मंदिरापर्यंत ही कावड पदयात्रा यात्रा पार पडली. येथे महाजलाभिषेक केल्यानंतर महाआरती झाली व भाविक, भक्तांमध्ये प्रसाद वितरण करण्यात आले.
यावल शहरात विस्तारित भागात भुसावळ रस्त्यावर गंगानगर परिसरातील श्री गंगेश्वर महादेव मंदिर आहे. येथे भाविक भक्तांच्या वतीने रविवारी भव्य कावड पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कावड यात्रा समितीचे अध्यक्ष सुनील गावडे, तुळशीराम माळी, रितेश बारी, अनिल गावडे, अनिकेत सरोटे, सागर चौधरी, ज्ञानेश्वर वरुडकर, रोहित वारके, योगिता लोखंडे या कावड यात्रेचे नेतृत्व केले. या कावड यात्रेत मोठ्या संख्येत महिलांचा सहभाग दिसुन आले. ही कावड यात्रा अंजाळे गावाजवळील तापीनदीच्या पात्रापासून पवित्र जल घेऊन अंजाळे येथील श्रीअर्जुनेश्वर महादेव मंदिरापासून ते थेट यावल शहरातील गंगानगर पर्यंत ही कावड यात्रा काढण्यात आली. सहवाद्य निघालेली ही कावड यात्रा शहरात दुपारी दाखल झाली.
यावल येथील महादेव मंदिरात महादेवांचा जलाभिषेक करण्यात आलेत,त्यानंतर आरती पार पडली व भाविक,भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. मोठ्या उत्साहात ही कावड यात्रा संपन्न झाली. या वेळी यावल शहरातुन निघालेल्या कावड यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा प्रवक्ते व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉ कुंदन फेगडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपला सहभाग नोंदविला.